देशातील आघाडीची गृहनिर्माण कर्जदार बँक HDFC ने मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोठी झटका दिला आहे. HDFC ने गृहकर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली. वाढीव दर विद्यमान ग्राहकांसाठी देखील लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा देखील मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. नवीन ग्राहकांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.8 टक्के असेल तर 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी हा दर 7.05 टक्के असणार आहे. 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याज दर 7.15 टक्के असेल, अशी माहिती मिळाली आहे.
HDFC ने 1 मे 2022 पासून गृह कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 0.05 टक्क्यांनी वाढवले आहे. या निर्णयाचा विद्यमान ग्राहकांना फटका बसणार आहे. बँकेच्या निर्णयामुळे थेट गृहकर्जाच्या मासिक हप्त्यात वाढ होणार आहे. मात्र, नवीन ग्राहकांसाठी व्याजदर बदललेले नाहीत, अशी देखील माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याआधी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने देखील गृहकर्जाच्या दरात वाढ केली होती.
नव्या ग्राहकांसाठी काय असेल व्याजदर…
HDFC चे नवीन ग्राहक 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्ज घेत असतील तर त्यांना 6.8 टक्के व्याजदर असणार आहे. मात्र, ते 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्ज घेत असतील तर त्यांच्यासाठी 7.05 टक्के व्याजदर असेल. तर 75 लाखांवरील गृहकर्जावर 7.15 टक्के व्याजदर असणार आहे, अशी माहिती बँकेच्य सूत्रांनी दिली आहे.
महिला ग्राहकांसाठी काय असेल व्याजदर…
नवीन महिला ग्राहकांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.75 टक्के व्याजदर असेल, नवीन महिलांसाठी 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 7 टक्के तर 75 रुपयांपेक्षा जास्त गृहकर्जावर 7.15 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. पुढील काही महिन्यांत रिझर्व्ह बँक देखील व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेईल, असे बोलले जात आहे.
रिझव्र्ह बँकेने गेल्या महिन्यात आपले तिमाही पतधोरण जाहीर केले होते. त्यात बँकेने चलनवाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर व्याजदर वाढवण्याबाबत विचाराधीन असल्याचे देखील सांगितले होते.