Saturday, July 5, 2025
Homeराजकीय घडामोडीशरद पवारांविषयी केलेली ‘ती’ पोस्ट अभिनेत्रीला पडणार महागात!

शरद पवारांविषयी केलेली ‘ती’ पोस्ट अभिनेत्रीला पडणार महागात!

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. आता केतकीने पुन्हा एकदा असेच काहीसे वक्तव्य केले आहे. यावेळी तिने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात (fb post) पोस्ट शेअर केली आहे.

अॅलडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळे आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दलची ही पोस्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी देखील केतकी एका पोस्टमुळे अडचणीत सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या या फेसबुक पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -