मिरज / प्रतिनिधी
रतनसी नगर येथे जुन्या वादाच्या कारणातून एकाला चाकूने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी जेसल अतुल ठक्कर वय 30 वर्षे धंदा व्यापार राहणार रतनसी नगर अमराई जवळ सांगली यांना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी अमीताभ उर्फ अमित प्रेमकुमार हंबर वय 49 वर्ष राहणार रतनसी नगर आमराई जवळ सांगली यांनी रात्री साडे अकराच्या सुमारास चाकूने फिर्यादीचे उजव्या बाजूस डाव्या हातावर व पाठीत सपासप वार करून फिर्यादीस गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत जेसल ठक्कर यांनी आरोपी अमिताभ हंबर याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कलम 307 गुन्हा दाखल केला आहे .सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे करीत आहेत.