ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. 46 वर्षीय सायमंड्स त्याच्या रेंज रोव्हर कारमधून प्रवास करत होते.
या दरम्यान, क्वीन्सलँड येथील एलिस रिव्हर ब्रिजजवळ त्यांची कार असंतुलित होऊन हा अपघात झाला. ज्यामध्ये सायमंड यांचा मृत्यू झाला. या वृत्ताने अँड्रयू सायमंड् यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा तिसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांचा मार्चमध्ये मृत्यू झाला होता.