भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने लोकूर (ता. कागवाड) येथील विश्वनाथ शंकर गडगे (वय ३८) हे ठार झाले. अंकली (ता. मिरज) येथे २२ मार्चरोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी योगेश नंदकुमार पाटोळे (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडगे २२ मार्च रोजी दुचाकीवरून (एम.एच.२३ के.क्यू-१८९९) कोल्हापूरहून सांगलीला येत होते. अंकली फाट्यावर आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरून (एम.एच. १० बी.डब्ल्यू०४०९) योगेश पाटोळी याने गडगे यांना जोराची धडक दिली होती. यामध्ये गडगे गंभीर झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत गडगे यांच्या पत्नी सविता यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पाटोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -