रोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर यांचे वतीने कोल्हापूर मधील शाहूपुरी जिमखाना मैदानावर ई-सेवा क्रिकेट स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ई-सेवा सभासद, आजी आणि माजी संचालक आणि विद्युत व्यावसायिक यांच्या अॅम्पियर, व्होल्टेज, पॉवर आणि एनर्जी अशा चार संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम चुरशीच्या सामन्यामध्ये अॅम्पियर संघाने पॉवर संघावर ९ गडी आणि एक चेंडू राखून विजय मिळविला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पॉवर संघाने ६ षटकांमध्ये ६५ धावा करुन ६६ धावांचे लक्ष्य अॅम्पियर संघापुढे ठेवले. अॅम्पियर संघाच्या सलामीवीर फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी केली. पॉवर संघाला अॅम्पियर संघाचा केवळ एक फलंदाज बाद करण्यात यश मिळाले.
ई-सेवा क्रिकेट स्पर्धा २०२२ साठी गुरुकृपा इलेक्ट्रिकल्स, दीपक एंटरप्रायजेस, ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिकल्स, पार्श्वनाथ इलेक्ट्रिक ट्रेडिंग कंपनी, जे. बी. लाईट हाऊस, प्रगती इलेक्ट्रिकल्स, जिजाऊ इलेक्ट्रिकल्स, हिडदुग्गी इलेक्ट्रिकल्स, भारत इलेक्ट्रिकल्स, शिवसिद्धी इलेक्ट्रिकल्स, श्री इलेक्ट्रिकल्स, स्पार्क लाईट हाऊस, शिवसाई इलेक्ट्रिकल्स यांनी प्रायोजकत्व स्विकारले होते.
ई-सेवा क्रिकेट स्पर्धा २०२२ यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी ई-सेवा क्रिकेट नियोजन समिती चे योगदान लाभले.