Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार सभा

कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार सभा

शिक्षक व पदवीधर मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार फेरी बुधवारी दुपारी नुकतीच संपन्न झाली. येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना व पदवीधरांना उमेदवार अरुण शहापूर व हनुमंत निराणी यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना नामदार जोल्ले म्हणाले, भाजपाचे दोन्हीही उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येणार असून शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी दोन्ही उमेदवार सक्षम असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

आज शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अनुदानित व विनाअनुदानित संस्था यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून या सर्व प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी दोन्ही उमेदवार सक्षम असून केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे अशा प्रश्नांचा निपटारा होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे सर्व शिक्षक व पदवीधर बंधू-भगिनीना प्रथम क्रमांकाचे मत देण्याचे आव्हान केले.

त्या पुढे बोलताना म्हणाले की कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेने विठ्ठल कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय प्रगती केली असून भविष्यकाळात या संस्थेने आपला नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने सदोदित प्रयत्नशील राहण्याचे आव्हानही यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक संघटनेचे लक्ष्मण कोणे, हालसिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री हलसिद्धनाथ शिक्षण समूहाच्या वतीने नामदार जोल्ले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विठ्ठल कोळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विद्या व्हटकर, अरुण पाटील, सचिन निकम, रामचंद्र कोळी, विलास नाईक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार दीपिका कांबळे यांनी मानले. फोटो: कोगनोळी : येथील प्रचार सभेत मनोगत व्यक्त करताना आमदार शशिकला जोल्ले शेजारी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विद्याताई व्हटकर व इतर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -