Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरराज्यसभा सहावी जागा : कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार 'दंगल'

राज्यसभा सहावी जागा : कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार ‘दंगल’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर; राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची मुदत आज (दि.३) दुपारी साडे तीन वाजता संपली. तिसऱ्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. परंतु दोन्हीही पक्षांकडून अर्ज कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.


राज्यसभेची सहावी जागा प्रतिष्ठेची करत आता पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपने शिवसेनेसमोर शड्ड ठोकला. माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करत रिंगणात उतरवले. यामुळे शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक या कोल्हापूरच्याच दोन मल्लांमध्ये आता जंगी लढत होणार आहे. पवारांना 16 तर महाडिकांना 21 मतांची गरज असून मैदान कोण मारणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी शिवसेना आणि भाजपलाही विजयी मतांपर्यंत पोचण्यासाठी दमछाक करावी लागणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे अपक्षांचा ‘भाव’ वाढणार असून घोडेबाजाराला उधाण येण्याची शक्यता आहे.


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी प्रारंभीपासून कोल्हापूर केंद्रस्थानी ठरले आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून या जागेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू केली. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी शक्यता होती; मात्र या सहाव्या जागेवर दावा सांगत संभाजीराजे यांना थेट शिवसेनेकडून लढण्याची ऑफर दिली. संभाजीराजे यांनी ती नाकारल्याने कोल्हापूरचाच शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता, जिल्हा प्रमुख संजय पवार यांना संधी देत शिवसेनेने त्यांना रिंगणात उतरवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -