पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही वर्षांत अर्थव्यवस्थेबाबत अनेक निर्णय घेतले. त्यावर अंमलबजावणी देखील केली आहे. आता आज (ता. 6 जून) रोजी काही नवीन नाण्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालं आहे. यावेळी ‘नवीन नाणी लोकांना सतत अमृत महोत्सवाच्या ध्येयांची आठवण करून देतील’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
PMO ने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभ 6 ते 11 जून दरम्यान होत आहे
तिथे मोदींनी जारी केलेल्या नवीन नाण्यात एक, दोन, पाच, दहा शिवाय वीस रुपयांच्या नाण्यांच्या विशेष मालिकेचे प्रकाशन होत आहे.
माहीतीनुसार, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या या नाण्यांवर AKAM चा (‘आझादी का अमृत महोत्सव’) लोगो असणार आहे. या लोगोमुळे सर्वात जास्त फायदा हा दृष्टिहीन व्यक्तींना मिळेल, अशी माहीती आहे. जेणेकरून ही नाणी त्यांना पटकन ओळखणं सोपं होईल. आताचा आठवडा 6 ते 11 जून 2022 या दरम्यान ‘आझादी का अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून सेलिब्रेट होत आहे.
दरम्यान, पीएम मोदी नवीन नाण्यांच्या विशेष मालिकेच्या अनावरणाव्यतिरिक्त पंतप्रधान क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल ‘जन समर्थ पोर्टल’ हे सरकारी क्रेडिट योजनांना जोडणारे वन-स्टॉप डिजिटल पोर्टलसुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. जन समर्थ पोर्टल हे अशा प्रकारचे पहिले व्यासपीठ आहे जे लाभार्थ्यांना थेट कर्जदारांशी जोडू शकणार आहे. या एकाच डिजिटल वेबसाईटवर लोक सरकारच्या सर्व अनुदान-आधारित योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत.