Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरविरोधी पक्षाने आधी त्यांचे आमदार सांभाळावेत : सतेज पाटील

विरोधी पक्षाने आधी त्यांचे आमदार सांभाळावेत : सतेज पाटील

आमच्या सोबत कोण आहे हे 10 जूनला मतदान झाल्यानंतर स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य करत विरोधी पक्षाने आधी त्यांचे आमदार सांभाळावेत, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी लगावला. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक रिंगणात आहेत. दोन्हीही उमेदवार कोल्हापूरचे असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नंबर्स’ बघितल्यास यामध्ये कोठेही अडचण येईल, अशी परिस्थिती सध्या नाही. गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही एकत्रित केलेले आमदार आमच्या सोबत आहेत. सात जूनला महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची अनेक कामे केली आहेत. महाविकास आघाडीची विचारसणी त्यांना पटली. त्यामुळे ते आमच्या सोबत आले. सत्ता स्थापनेवेळी त्यांना भाजपसोबत जाण्याची संधी होती मात्र ते गेले नाहीत. यामुळे कोणीही बाजूला जाणार नाही. संजय पवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -