दीर्घकाळापासून जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत आपले स्थान निर्माण करणारे भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचे गेल्या 24 तासांत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही उद्योगपतींची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली आली असून दोघांमध्ये आता एकाच स्थानाचे अंतर राहिले आहे.
अंबानींना 1.82 अब्ज डॉलरचे नुकसान
गुरुवारी वृत्त लिहिपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 1.82 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे समोर आले. या घसरणीनंतर अंबानींची संपत्ती 99.3 अब्ज डॉलरवर आली. रिलायन्सच्या शेअर्सच्या वाढीच्या जोरावर मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांचे वर्चस्व कायम असले तरी त्यांच्या निव्वळ संपत्तीत पुन्हा घट झाली आहे. सध्या अव्वल श्रीमंतांच्या यादीत अंबानी आठव्या क्रमांकावर आले आहेत.