Saturday, July 5, 2025
Homeसांगलीसांगली :  दोन मुलांना घेवून आई बेपत्ता

सांगली :  दोन मुलांना घेवून आई बेपत्ता

कामेरी (ता. वाळवा) येथून दोन मुलांना घेवून आई बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आई सोनाली राजेश पाटोळे (वय 30, रा. हिंगणगाव, कवठेमहांकाळ, सध्या रा. कामेरी), मुलगा विराज (वय 8), स्वराज (वय 6) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी सोनाली या दोन्ही मुलांना घेवून बाहेर पडल्या होत्या.

सोनाली यांचा भाऊ सूर्यकांत मदने यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात तिघे बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून शनिवारी सूर्यकांत हे टेम्पो घेवून बाहेरगावी गेले होते. सायंकाळी ते घरी आले. त्यावेळी सूर्यकांत यांच्या पत्नीने सोनाली या काही न सांगता मुले विराज, स्वराज यांना घेवून निघून गेल्याचे सांगितले.

सूर्यकांत यांनी सोनाली यांच्या सासरकडे, नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर सूर्यकांत यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात तिघे बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -