आजच्या डिजिटल काळात पैसे ट्रान्सफर करणं अतिशय सोपं झालं आहे. जेव्हापासून UPI (Unified Payment Interface) आले तेव्हापासून खरं तर बँकिंग सेक्टर मध्ये क्रांतीच झाल्यासारखं वाटायला लागलं आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण या डिजिटल पेमेंट पद्धतीमुळे बहुतांश ठिकाणी आज कॅशलेस व्यवहार होताय. ना जवळ पैसे ठेवण्याची गरज, ना पैसे चोरीला जाण्याची भीती अशा कित्येक समस्या या यूपीआयमुळे सुटल्या.
यूपीआय अल्पावधीतच लोकप्रिय होऊन ते जलद आणि खास पेमेंट पद्धतींपैकी एक बनले आहे. तुम्ही Phonepe, GPay, Paytm, BHIM सारख्या अनेक Apps व बँकांच्या ऑफिशियल ॲपच्या मदतीने क्षणात पैसे पाठवता ते फक्त UPI मुळे! एका दिवसभरात तुम्ही भरपूर व्यवहार त्याद्वारे करतात. पण ते एका लिमिट पर्यंतच ट्रान्सझॅक्शन होते, असं दिसलं असेल. पण हे लिमिट बँकेवर अवलंबून असते, हे माहीत असायला हवं.
कोणत्या बँकेचे किती लिमिट आहे, ते जाणून घेऊ..
State Bank Of India – भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट 1 लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय, त्याचे डेली ट्रान्सझॅक्शन लिमिट देखील 1 लाख रुपये आहे.
HDFC Bank – खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँकेचे यूपीआय ट्रान्सझॅक्शन आणि लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपये प्रति दिवस ठेवलं आहे. मात्र नवीन ग्राहक पहिल्या 24 तासांत फक्त 5,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन करू शकतो.
Axis Bank – ॲक्सिस बँकेचे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि बँकेचे डेली लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपयांपर्यंत आहे.
Punjab National Bank – पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ट्रान्सझॅक्शन लिमिट 25,000 रुपये तर दिवसाला यूपीआय लिमिट 50,000 रुपयांपर्यंत निश्चित केलंय.
Bank Of India – बँक ऑफ इंडिया या बँकेने UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि एका दिवसाचं लिमिट 1 लाख रुपये सेट केलं आहे.
ICICI Bank – आयसीआयसीआय बँकेची UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि डेली लिमिटसुद्धा 10,000-10,000 रुपये आहे. मात्र Google Pay युझर्ससाठी या दोन्ही लिमिट 25,000 रुपये आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
(बँकांच्या नियमांत बदल झाल्यास वरील UPI व्यवहाराचे लिमिट वाढू अथवा कमी होऊ शकते.)