Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : विधवा महिलांनीही साजरी केली वटपौर्णिमा

कोल्हापूर : विधवा महिलांनीही साजरी केली वटपौर्णिमा

कोल्हापूर जिल्ह्यातील विधवा प्रथा बंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत नुकतेच राज्यभरात झाले. असे असतानाच आता विधवा महिलांनी वटपौर्णिमा साजरी करून आपल्या सामाजिक हक्कांसाठी पुढे पाऊल टाकले आहे.

वर्षानुवर्षे विधवा महिलांना धार्मिक कार्यक्रमांत डावलले जात असून अशा महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या मंगल शेटे यांच्या पुढाकारातून ही अनोखी वटपौर्णिमा साजरी झाली.

मंगळवार पेठ येथील शिंदे गल्लीमध्ये श्रीमती संजीवनी कुराडे, श्रीमती संगीता कुराडे, श्रीमती वत्सला शिंदे, श्रीमती पिसाळ आदी विधवा महिलांच्या हस्ते वडाचे पूजन करून त्यांना सन्मान मिळवून देण्यात आला. यावेळी परिसरातील महिला आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -