Thursday, December 18, 2025
Homeकोल्हापूरगणेशोत्सव : मंडळांना खूश करण्यासाठी चुरस ; यंदाचा गणेशोत्सव उत्साहात

गणेशोत्सव : मंडळांना खूश करण्यासाठी चुरस ; यंदाचा गणेशोत्सव उत्साहात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; यंदाचा गणेशोत्सव अपूर्व उत्साहात आणि प्रचंड जल्लोषात होणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या गणेशोत्सवात नेत्यांमधील ईर्ष्या टोक गाठणार आहे. त्याचबरोबर मंडळांचा कलही स्पष्ट होणार आहे. कोट्यावधींची उधळण तर होईलच. त्याचबरोबर नेत्यांची ईर्ष्या पणाला लागेल.



2019 मध्ये महापुराने थैमान घातले. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. त्यानंतरच्या सलग दोन वर्षांत कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले. तीन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या उत्सवात प्रचंड जल्लोष असेल. तरुणाईने तीन वर्षांपासून रोखून धरलेल्या जल्लोषाला यंदा झळाळी येईल.

मंडळांच्या भूमिकाही स्पष्ट होतील. कोणाचा कल कोणाकडे, हे यातून दिसून येईल. शहरात महापालिका निवडणुका असल्यामुळे मंडळांना स्थानिक पातळीवर प्रायोजक मिळविणे सोपे जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, अन्यत्र नगरपरिषदांच्या निवडणुका असल्याने जिल्हाभर उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण असणार आहे.

गणेशोत्सव दिवसेंदिवस खर्चिक होत चालला आहे. नामवंत बँड, आरास आणि रोषणाई हे चित्र आता मागे पडले आहे. डॉल्बी सिस्टीम, लेसर यामुळे हजारोंचा खर्च आता लाखात गेला आहे. केळीचे खुंट आणि फुलांची सजावट करून निघणारे गणपतीचे रथ आता डिजिटल युगात रोषणाईने झगमगत आहेत. मात्र, या सर्व झगमगाटाला येणारा खर्चही मोठा आहे. त्यासाठी प्रायोजक शोधणे हे मंडळांसमोर नेहमीच आव्हान असते. यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगले प्रायोजक मिळतील. तीन सदस्यांचा एक प्रभाग झाल्यामुळे जुन्या एकेका प्रभागात मंडळे इच्छुकांशी संपर्क साधतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -