ताजी बातमी ऑनलाईन टीम
काश्मिरी पंडित आणि लिचिंगवरून तथाकथित केलेल्या वक्तव्यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी अडचणीत आली आहे. तिच्या वक्तव्याचा निषेध करत बजरंग दलाने तिने माफी मागावी, अशी मागणी केलीय. दरम्यान, तिच्याविरोधात हैदराबादमध्ये पोलिस तक्रार करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
साई काय म्हणाली होती? साई पल्लवीने एका युट्यूब चॅनेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, तिला तिच्या विचारसरणी बद्दल विचारले असता ती म्हणाली, “ मला मी लहान असल्यापासून शिकवण्यात आले आहे की, चांगली व्यक्ती हो, त्यामुळे मी तटस्थ राहण्याला पसंती देते. जर का तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे असाल आणि जर का तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता.”





