मान्सून सक्रिय जरी असला तरी महाराष्ट्रात मान्सून येण्यासाठी विलंब होत असल्याचे कारण पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. 19 ते 21 जून या कालावधीत घेणार असून, राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ (yellow alert))चा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला असल्याचीही माहिती देण्यात आली.
यंदा मान्सूनला विलंब झाला असला तरी काही भागात मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांना याचा आधार मिळाला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पाऊस पाडण्यात अपयशी ठरतो आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, पंधरा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला.
पाकिस्तानातून सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे. दरम्यान अरबीसमुद्रातून मान्सूनची वाटचाल योग्य असली तरी पाकिस्तानातून जोरात येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील काही भागातून मान्सूनला पुढे सरकता येत नाही. Imd ने दिलेल्या माहितीनुसार मध्यपदेशातील बडवाणीमध्ये मान्सून थांबला आहे. दरम्यान मान्सूनने वाटचाल केल्यास बडवानी आणि इंदूरऐवजी जबलपूरमार्गे महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपासून जबलपूरमध्येही हलका पाऊस सुरू झाला आहे.
बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली तीव्र झाल्यामुळे हा पाऊस होत आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ वेद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर आणि त्याच्या लगतच्या भागात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे, तर माळवा-निमारमध्ये दोन दिवस पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता आहे. भोपाळमध्येही मान्सून 18 तारखेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी : 20 ते 21 जून – सिंधुदुर्ग: 18 ते 21 जून
यलो अलर्ट : 19 ते 21 जून
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.