Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगAgneepath Scheme: 'अग्निपथ'साठी होणाऱ्या भरतीच्या तारखा जाहीर; गुन्हा दाखल झालेल्यांना मिळणार नाही...

Agneepath Scheme: ‘अग्निपथ’साठी होणाऱ्या भरतीच्या तारखा जाहीर; गुन्हा दाखल झालेल्यांना मिळणार नाही संधी


देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ भरती योजनेला तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रुमखांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जून, नौदलाची २५ जून तर भुदलाची १ जुलैपासून सुरु होईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांना या भरती प्रक्रियेत संधी मिळणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, अग्निपथ भरती योजनाही अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. गेली दोन वर्ष यावर विचार सुरु होता. या योजनेचा उद्देश हा तरुणांमध्ये उत्साह आणि जागृती निर्माण करण्याचा आहे. ही योजना देशातील युवकांसाठी अत्यंत फायदेशरी आहे. सर्व अग्निवीरांना लष्करातील जवानांनुसार सर्व सोयीसुविधा असणार आहेत. ही योजना देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करुनच तयार करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे भरतीची संधी नाही.

अग्निपथ भरती योजनेविरोधात देशातील काही राज्यांमध्ये विरोध सुरु आहे. तसेच काही ठिकाणी आंदोलनास हिंसक वळणही लागले. हिंसाचारात रेल्वेसह सरकारी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिंसाचार प्रकरणी ज्या युवकांवर गुन्हा दाखल झाले आहेत त्यांना भरतीची संधी दिली जाणार नाही, असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -