Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगउद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक; सेना उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष की फुटलेल्या...

उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक; सेना उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष की फुटलेल्या मतांबाबत चिंतन?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला भाजपनं पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांनी चारी मुंड्या चीत केलंय. विधानसभेच्या 10 जागांपैकी भाजपचे पाच तर र महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.


महाविकास आघाडीचा सहावा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलाय. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसची हक्काची तसंत सहयोगी अपक्ष आमदारांची तब्बल 21 मतं फुटली आहेत. अशावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष होणार की फुटलेल्या मतांवर विचारमंथन होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -