Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगबैठकीस कोणीच हजर नाही असे म्हणणे चुकीचे : खा. धैर्यशिल माने

बैठकीस कोणीच हजर नाही असे म्हणणे चुकीचे : खा. धैर्यशिल माने

कोणत्याही आमदारांना आणि खासदरांची बैठक बोलावली नाही, त्यामुळे शिवसेनेच्या मिटिंगला कोणताही खासदार हजर नाही असे म्हणणे चुकिचे आहे असे खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते धैर्यशिल माने यांनी माध्यमांना सांगितले.

मुंबईमध्ये सकाळी शिवसेनेच्या आमदार, खासदार याचबरोबर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीस राज्यातील महत्वाचे नेते हजर नसल्याची चर्चा सुरु होती. या बैठकीसाठी खा. भावना गवळी आणि खा. राजेंद्र गवळी गैरहजर होते. त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारसुद्धा नाराज आहेत की काय असं बोललं जात आहे. शिवसेनेच्या या नाराजीनाट्यामध्ये उरलेले नेते सहभागी आहेत की काय याबद्दल मतांतरे व्यक्त केली जात आहेत.

या चर्चांना छेद देऊन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते धैर्यशिल माने यांनी आज कोणतीच बैठक बोलावली नसल्याचे माध्यमांना सांगितले. ते म्हणाले की, “आज कोणतीही बैठक बोलवण्यात आलेली नाही. त्यामुळे बैठकीस कोणी खासदार हजर नाही असे म्हणणे चुकिचे आहे. माध्यमामध्ये खासदरांच्या नाराजीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत.” असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -