Tuesday, July 8, 2025
Homeराजकीय घडामोडीएकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांची संख्या वाढली, आणखी काही आमदार गुवाहाटीत दाखल!

एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांची संख्या वाढली, आणखी काही आमदार गुवाहाटीत दाखल!


विधानपरिषद निवडणुकीनंतर (Legislative Council Elections) राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) हे चांगलेच अडचणीत आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी बंड पुकारत मोठा राजकीय भूकंप केला. एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटीमध्ये (Guwahati) आहेत. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा ते करत आहेत. अशामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या ही वाढत चालली आहे. शिवसेनेच्या आणखी दोन आणि दोन अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गुवाहाटी गाठली आहे. तर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने (Shivsena MLAs) अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. आपल्यासोबत असलेल्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी आधी सुरत गाठले. त्यानंतर ते त्यांना घेऊन थेट गुवाहाटीला गेले. एकनाथ शिंदे यांच्या या अचानक घेतलेल्या ऐवढ्या मोठ्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये एकनाथ शिंदे यांचे बंड शमवण्याचे शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीमध्ये आले आहे.

अशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री जनतेची संवाध साधला. यावेळी त्यांनी ‘मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मी ओढूनताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मला कोणताही मोह अडवू शकत नाही, असे ठामपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्री गाठली. उद्धव ठाकरे मातोश्रीकडे येत असताना रस्त्यावर शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तर याआधीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मंत्रीपद हटवले होते.

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम या शिवेसेना आमदारांसह मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार देखील बुधवारी रात्री गुवाहाटीमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या आणखी दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असून ते सुद्धा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांनी याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना त्यांच्या बाजूने असलेल्या आमदारांची सही असलेलं एक पत्र पाठवले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -