Sunday, July 6, 2025
HomeमनोरंजनArjun Kapoor सोबत रोमँटिक व्हॅकेशन टूरवर निघाली Malaika Arora, ड्रेसिंगवरुन युजर्सने केले...

Arjun Kapoor सोबत रोमँटिक व्हॅकेशन टूरवर निघाली Malaika Arora, ड्रेसिंगवरुन युजर्सने केले ट्रोल!

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Actor Arjun Kapoor) येत्या 26 जून रोजी आपला 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्जुन कपूर आपला वाढदिवस गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Actress Malaika Arora) साजरा करणार आहे. आपला वाढदिवस (Arjun Kapoor Birthday) तो मुंबईपासून दूर पॅरिसमध्ये गर्लफ्रेंड मलायकासोबत साजरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या रोमँटिक व्हॅकेशन टूरसाठी (Romantic Vacation Tour) अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा रवाना झाले आहेत. मुंबई एअरपोर्टवरील त्यांचा व्हिडिओ (Arjun-Malaika Video) सध्या समोर आला आहे. मलायका आणि अर्जुन पॅरिससाठी निघाले असून दोघेही अतिशय स्टायलिश अंदाजमध्ये व्हॅकेशनला निघाल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

 

रोमँटिक व्हॅकेशन टूरसाठी निघालेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने खूपच जबरदस्त ड्रेसिंग केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अर्जुनच्या ड्रेसिंगवरुन नाही तर मलायकाच्या ड्रेसिंगवरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ऐवढंच नाही तर अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातील वयाच्या अंतरावरुन देखील त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. हे पहिल्यांदाच घडत नाही तर या आधी देखील दोघांना बऱ्याच वेळा ट्रोल करण्यात आले आहे.

 

अर्जुन आणि मलायका गुरुवारी रात्री मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले. मुंबई एअरपोर्टवरून या कपलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये मलायका काळ्या रंगाच्या हुडी-शॉर्ट्स ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने या ड्रेसवर काळ्या बुटांनी एअरपोर्ट लुक पूर्ण केला. अर्जुन कपूरच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर तो टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये ब्लॅक लेदर जॅकेटमध्ये दिसत आहे. बॉलीवूड फोटोग्राफर विरल भयानीने अर्जुन-मलायकाच्या व्हेकेशन टूर व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

मलायका अरोरा तिच्या एअरपोर्ट ड्रेसवरुन ट्रोल झाली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मलायका पँट घालायला विसरली आहे.’ दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आंटी विथ बेटा.’ तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘आई आणि मुलगा छान दिसत आहेत.’ तर आणखी एका युजरने लिहिले, “व्वा काय क्षण आहे. मुलगा आंटीसोबत हनिमूनला जात आहे.’ तर आणखी एका युजरने मलायका आणि अर्जुनची खिल्ली उडवत ‘बाप और पती का पैसा स्वाहा’ असे लिहिले आहे. तर मलायकाच्या ड्रेसवर कमेंट करत एका यूजरने तिला विचारले आहे की, “तिने रेनकोट का घातला आहे?”

दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय कपलपैकी एक आहे. सोशल मीडिया किंवा बॉलिवूड पार्टी दोघंही एकमेकांवरील प्रेम बिनधास्त व्यक्त करताना दिसतात. अर्जुन आणि मलायका या दोघांनी 3 वर्षांपूर्वी आपल्या नात्याची कबुली दिली होती. मलायकानं अर्जुनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेम व्यक्त केले होते. अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. अर्जुन लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो डे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ या चित्रपट देखील पाहायला मिळणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -