Monday, July 7, 2025
Homeसांगलीमिरज : म्हैसाळ हत्याकांड प्रकरनातील मांत्रिक रुग्णालयात

मिरज : म्हैसाळ हत्याकांड प्रकरनातील मांत्रिक रुग्णालयात

म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला मांत्रिक आब्बास बागवान याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अटकेतील त्याचा साथीदार धीरज सुरवशे याला दहा दिवस पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला आहे. वनमोरे कुटुंबाच्या आत्महत्येचा तपास सुरू असतानाच गुप्तधनाचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. मृत वनमोरे कुटुंबातील सदस्यांचे ‘कॉल डिटेल्स’ काढल्यानंतर बागवानचे नाव निष्पन्न झाले होते.

सोमवारी पहाटे सोलापुरात छापा टाकून बागवान व त्याचा साथीदार सुरवशे याला अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना ‘काय त्रास होतोय का’, अशी विचारणा केली. यावर बागवानने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले आहेत.

सुरवशेला न्यायालयात उभे करण्यात आले. पोलिसांना नऊ जणांच्या हत्याकाडांच्या तपास मुळापर्यंत करावा लागणार आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? नऊ जणांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली? या सर्व बाबींचा उलघडा करणे आवश्यक आहे. यासाठी पंधरा दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सुरवशेला दहा दिवस (दि. 7 जुलैपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम हे तपासाचा सातत्याने आढावा घेत आहेत. तपासात कोणत्याही प्रकरचा हलगर्जीपणा नको. मुळापर्यंत जाऊन तपास करा, कोणाचीही गय करू नका, असे आदेश त्यांनी मिरज पोलिसांना दिले आहेत.

पथक तळ ठोकून; दोघांच्या घराची झडती ‘एलसीबी’चे पथक मंगळवारी सकाळी पुन्हा सोलापूरला रवाना झाले आहे. या प्रकरणातील आणखी काही माहिती त्यांच्या हाती लागली आहे. पथक तिथे तळ ठोकून आहे. तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पथकाने बागवान व सुरवशेच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -