ताजी बातमी ऑनलाईन टीम
कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते म्हणून एकनाथ शिंदे यांची जनमानसात ओळख आहे. शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन विधिमंडळ, विधान परिषद आणि संसदेपर्यंत पाठवले. एकनाथ शिंदे देखील त्यापैकीच एक आहेत. शिवसेनेत आज बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नाव तितकेच आदराने घेतले जाते. एकनाथ शिंदे आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एक रिक्षाचालक, नगरसेवक, कॅबिनेट मंत्री आणि आता थेट राज्याचे मुख्यमंत्री, असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 ला झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. घरच्या गरीब परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं.नंतर ते ठाणे शहरात आले. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांना एका मासळी विक्री करणाऱ्या कंपनीत काम करावे लागले. पण, मिळणाऱ्या पैशात काहीच भागत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी काम सोडले आणि रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेतले. त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरूवात केली.
सत्तर च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने अनेक युवक शिवसेनेशी जोडले गेले. त्याचवेळी ठाण्याचे आनंद दिघे शिवसेनेशी जुळले. त्यावेळी आनंद दिघेंच्या नेतृत्त्वात ठाण्यामध्ये शिवसेनेचे काम अगदी जोमात होते.ऐंशीच्या दशकात एकनाथ शिंदें हे आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला राजकीय वळण लागले आणि तिथूनच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली.
हालाखीच्या परिस्थितीमुळे अर्धवट सोडलं शिक्षण, रिक्षाचालक ते मुख्यमंत्री… असा आहे एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -