ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आला त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपले बहुमत सिद्ध करुन दाखवले. शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या सरकारला आव्हान केले आहे. ‘हिमंत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा.’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी आज संवाद साधला. यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात आज दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला. तसंच यावेळी त्यांनी शिंदे सरकारला हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा.’, असे आव्हान त्यांनी केले आहे.