बॉलिवूड एक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) सध्या तिचा अपकमिंग मूव्ही ‘एक विलेन रिटर्न’च्या प्रमोशनात व्यग्र आहे. या चित्रपटात दिशा हिच्या शिवाय अर्जुन कपूर (Arjun Kapoor), तारा सूतरिया (Tara Sutaria) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट प्रमोशनच्या दरम्यान, दिशा पेक्षा तिने नेसलेल्य पिंक साडीचीच जास्त चर्चा होते आहे.
दिशा पाटनी सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह असते. विशेष म्हणजे ती तिच्या हॉटनेसमुळे कायम लाईमलाईटमध्ये राहते. दिशा पाटनी तिच्या सौंदर्याने क्षणात चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. दिशाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर दिशाचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.
दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा स्टनिंग फोटो शेअर केला आहे. तिने फोटोत पिंक साडी नेसली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. दिशाने पिंक साडीवर सिल्व्हर कलरचा ब्लाउज परिधान केला आहे. एक्ट्रेसने लाइट मेकअपसोबत ईयरिंग्स देखील कॅरी केल्या आहेत. विशेष म्हणजे तिने केस मोकळे सोडल्याने ती खूपच क्यूट दिसते आहे.
दिशाचा स्टनिंग अवतार पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. यूजर्स कमेंट बॉक्समध्ये दिशासाठी रेड हार्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव करताना दिसत आहेत.