Friday, August 1, 2025
Homeसांगलीसांगली : अलमट्टीतून 1 लाख क्यूसेक विसर्ग

सांगली : अलमट्टीतून 1 लाख क्यूसेक विसर्ग

अलमट्टी जलाशयात पाण्याची पातळी 517 मीटरपर्यंत झाल्याने या धरणातून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता 1 लाख क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. बारा तासात सुमारे 40 हजार क्यूसकने पाणी सोडण्याचे प्रमाण वाढवण्यात आलेले आहे.

महापुराच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि त्यामधून सोडण्यात येणारे पाणी याकडे लक्ष आहे. अलमट्टी धरणातील जलाशयाची क्षमता 519. 60 मीटर आहे. सध्या या जलाशयामध्ये 517 मीटर म्हणजे 87. 99 टीएमसी पाणीसाठा आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास 1 लाख 4 हजार 852 क्यूसेक पाण्याची धरणामध्ये आवक सुरू होती. तर एक लाख क्यूसेकने जावक सुरू होती.

सकाळी या धरणातून 56 हजार 936 क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणांमध्ये 83 . 85 टीएमसी पाणी होते. त्यात 24 तासात पाच टीएमसीने वाढ झालेली आहे. महापूराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -