Sunday, July 6, 2025
Homeसांगलीसांगली : चोरट्या महिलांची टोळी जेरबंद

सांगली : चोरट्या महिलांची टोळी जेरबंद

सांगली – कोल्हापूर रस्त्यावर अंकली (ता. मिरज) हद्दीत बांधकामावरून स्लॅब साहित्य चोरून नेत असताना तेथील रखवालदाराने पाच जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये चार महिलांसह रिक्षा चालकाचा समावेश आहे.

शिल्पा प्रकाश लोंढे, ज्योती रवि काळे, पद्मिनी लोंढे, गंगा लोंढे (चौघी रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) व रिक्षाचालक बाबासाहेब नामदेव खरात (अष्टविनायकनगर, गल्ली क्रमांक 6 विश्रामबाग) अशी या टोळीतील पाच जणांची नावे आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांनी पाचही संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून स्लॅबसाठी सळईपासून तयार केलेल्या रिंगा व तारा असे एकूण 12 हजार 250 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यासोबत रिक्षाही ताब्यात घेण्यात आली आहे.

याबाबत संजय रमेश खत्री (वय 36, रा. शिवशंकर सोसायटी, विश्रामबाग) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खत्री यांचे अंकली गावच्या हद्दीत लकी फर्निचरसमोर बांधकाम सुरू आहे. बांधकामावर स्लॅब टाकण्यासाठी त्यांनी सळई आणली आहे. ती त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी ठेवली होती . स्लॅब टाकण्यासाठी सेंट्रिंग कामगारांनी दोन दिवसापूर्वी सळईपासून रिंगासह अन्य साहित्य तयार केले होते. ते साहित्य त्यांनी कॉम्पलेक्समध्ये ठेवले होते. शुक्रवारी पहाटे संशयित रिक्षातून तेथे गेले. स्लॅबचे साहित्य रिक्षात भरून ते निघाले होते. त्यावेळी हा प्रकार पाहून रखवालदार अनिल राजाराम कोळी यांनी त्यांना पकडले. यावेळी संशयित कोळी यांच्या अंगावर धाऊन गेले. त्यामुळे कोळी यांनी आरडाओरड केली.

यावेळी परिसरातील लोक जमा झाले. लोकांनी संशयितांना पकडून ठेवले. ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. खत्री यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी यापूर्वीही चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -