ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; वादळ वारा वा पावसामुळे वीजतारांवर झाड
वा झाडांची फांदी तुटून पडणे, वीज तारा तुटणे, वीज खांब वाकणे वा पडणे, रोहित्र पडणे असे प्रकार घडतात. त्यामुळे विजेच्या तारांखाली, वीज खांब, रोहित्राजवळ थांबणे टाळावे. विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आदीसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. तेव्हा नागरिकांनी विद्युत यंत्रणेपासून सावध राहावे. त्याबाबत महावितरणच्या नजिकच्या
कार्यालयास त्वरित सूचना द्यावी.
पाऊस चालू असतांना विजेचा पंप चालू अथवा बंद करणे टाळावे. जनावरे, गुरे ढोरे विजेच्या खांबास, तारास तसेच खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. पाणी हे वीज सुवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्यासी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. विद्युत उपकरणे हाताळतांना पायात रबरी चप्पल किंवा बूट घालावा. एखाद्याला विजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तिला स्पर्श न करता त्याला कोरड्या लाकडाने बाजूला करावे, त्वरित कृत्रीम श्वास देत रुग्णालयात घेऊन जावे.