ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज; येथील मिरज शहर पोलिस ठाण्यात तरुण आणि तरुणीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु सावकारी गुन्ह्यात पोलिसांवर दबाव आणण्यासाठी संबंधितांनी स्टंट केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित दोघांच्या आई-वडिलांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील फिर्यादीच्या घरात संबंधित दोघे सारखे डोकावून पाहत होते. याची तक्रार करण्यासाठी फिर्यादी मिरज शहर पोलिस ठाण्यात आले होते.
याची माहिती मिळताच संबंधित दोघे शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आहे. त्यांनीदेखील तक्रारदार यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आले असल्याचे सांगितले. परंतु हा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना तेथे तक्रार देण्यास सांगण्यात आले. परंतु आई-वडिलांवर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी पुन्हा तक्रार देण्यासाठी आल्याने दोघांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा बनाव करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी तत्काळ दोघांना रोखून शिवीगाळ प्रकरणाची तक्रार देण्यासाठी त्या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात पाठविले. सावकारी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात दबाव आणण्यासाठी दोघांकडून स्टंटबाजी ही केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.