Thursday, July 3, 2025
Homeसांगलीनगरसेवक योगेंद्र थोरात गरजले..!नागरिक सुज्ञ झालेत तुम्हाला दारात उभा सुध्दा होऊ देणार...

नगरसेवक योगेंद्र थोरात गरजले..!नागरिक सुज्ञ झालेत तुम्हाला दारात उभा सुध्दा होऊ देणार नाहीत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बाळासाहेब होनमोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आज प्रसारमाध्यमांशी नगरसेवक योगेंद्र थोरात हे बोलत असताना म्हणाले की मी सोशल मीडियावर २ दिवसांपूर्वी बाळासाहेब होनमोरे यांनी आमदार सुरेश खाडे यांच्यावर आरोप केलेले बघीतले पण मला बाळासाहेब होनमोरे यांना विचारायचं आहे की त्यांना हा बोलण्याचा अधिकार आहे का?त्यांना विधानसभेला उभं केलं देवमाने यांनी अर्ज मागे घेतल्याने होनमोरे यांची वर्णी लागली.त्यांना मिरजेच्या सुज्ञ नागरिकांनी काहीही न करता ६५ हजार मते दिली.कोणाचीही कामे न करता, प्रयत्न न करता त्यांना गेल्या विधानसभेला मिळाली.त्यानंतर कोरोनाचे संकट आले,महापूराचे सकंट आले पण ६५ हजार मते घेऊन सुध्दा ते नागरिकांच्या मदतीला आले का नाही.

कोरोनामध्ये किंवा महापूरामध्येही हजारो नागरिकांना स्थलांतरित केले ते दिसले नाहीत.स्थलांतरित नागरिकांची वाचारपूस राहुदे साधं किट सुध्दा त्यांनी दिले नाही.ते कश्यामध्ये व्यस्त होते तर स्वतःचे पॅट्रोल पंप काढणे, स्वतःचे बॅंक काढणे, स्वतःचा व्यवसाय वाढविणे यामध्ये ते व्यस्त होते.आणि आज निवडणूका जवळ आल्यावर चला उद्योजक बनूया असे शिबीर त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला भरविले होते.होनमोरे चला उद्योजक बनूया का चला आमदार बनुया आता नागरिक गंडणार नाहीत.येथे फक्त काम करणाऱ्यालाच स्थान आहे.येथील नागरिक आता सुज्ञ झाले आहेत.निवडणूक झाल्यापासून तुम्ही ६५ हजार नागरिकांना काय योगदान दिलं ते सांगावं.आता नागरिक सुज्ञ झाली आहेत.तुम्हाला दारात उभा सुध्दा होऊ देणार नाहीत अशी जबरी टीका नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -