Saturday, August 2, 2025
HomeसांगलीSangli news : मोकाट घोड्याने घेतला मुलाचा चावा

Sangli news : मोकाट घोड्याने घेतला मुलाचा चावा

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्र.१० रतनशीनगरसह परिसरामध्ये भटकी कुत्री तसेच मोकाट जनावरांनी दहशत माजविली आहे. कुत्र्यापाठोपाठ घोड्यांनीही आता चावा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज एक मुलाचा घोड्याने चावा घेतला. त्यामुळे मुलगा जखमी झाला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात सगळीकडे मोकाट कुत्री आणि जनावरांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. वारंवार सुचना करुनही कुत्र्यांचा, घोड्यांचा बंदोबस्त केला जात नाही. स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी अनेकवेळा जोरदार चर्चा घडवून आणलेली होती.

सभापती निरंजन आवटी यांनी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश देऊनही प्रशासन मुग गिळून गप्प आहे. रतनशीनगरमध्ये मोकाट घोड्याने अनेकांना चावा घेतला आहे. मोकाट जनावरांनी दहशत माजवली आहे. यामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. परिसरातील सुनील झंवर यांनी नगरसेवकांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -