Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी मातोश्रीतून अभिजित पाटील यांची निवड

सांगली : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी मातोश्रीतून अभिजित पाटील यांची निवड



शिवसेनेच्या सांगली जिल्हाप्रमुखपदी चिकुर्डे (ता. वाळवा) येथील अभिजित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सांगलीचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने नवे जिल्हाप्रमुख म्हणून पाटील यांची निवड झाली. मंगळवारी मातोश्रीवरून ही निवड जाहीर करण्यात आली.



अभिजित पाटील यांनी सन २०१५ साली काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापुर्वी त्यांनी चिकुर्डे मतदारसंघातून दोनवेळा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. सन २०१४ साली आ. जयंत पाटील यांच्याविरोधात त्यांनी विधानसभा निवडणुकही लढविली होती. आनंदराव पवार यांनी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटील यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. शिवसेना प्रमुखांनी मंगळवारी (दि.२६) त्यांची निवड जाहीर केली. या निवडीनंतर बोलताना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काम करू, असा विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -