ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; महापालिका शाळांना पुरेसे शिक्षक न दिल्यास महापालिकेत शाळा भरवू, असा इशारा स्थायी समिती सभेत सदस्यांनी दिला. महापालिका क्षेत्रात गुंठेवारी व अविकसित भागात मुरमीकरणासाठी आणखी 40 लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. कुपवाड हद्दीतील विस्तारीत भागातील मातीच्या रस्त्यांचे मुरमीकरण करण्यासाठी 1 कोटींच्या कामासाठी निविदा मागविण्यासही मान्यता देण्यात आली.
महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. स्थायी समिती सभापती निरंजन आवटी अध्यक्षस्थानी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, गजानन आलदर, करण जामदार, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, मनगू सरगर, सविता मदने, सुनंदा राऊत, अनिता व्हनखंडे, पद्मश्री पाटील, गायत्री कल्लोळी, कल्पना कोळेकर, नर्गिस सय्यद, संगीता हारगे तसेच अधिकारी उपस्थित होते.