Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : एसटीची ठोकर बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

कोल्हापूर : एसटीची ठोकर बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव एसटीची दुचाकीला जोराची ठोकर बसली. यामध्ये दुचाकीस्वार (bike rider) जागीच ठार झाला. चंदर तुकाराम कांबळे ( वय 42, रा. नागाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) असे मृत झालेल्याचे नाव आहे. हा अपघात कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावरील घोडके मळा फाट्यानजीकच्या धोकादायक वळणावर मंगळवारी दुपारी घडला. यांची नोंद पोलिसांत झाली आहे. मृत चंदर कांबळे हे कोल्हापुरात टिंबर मार्केट येथे टेम्पो व्यावसायिक म्हणून काम करीत होते.

पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील शाहू मैदानकडून एसटी बस नंदगाव दिंडनेर्लीकडे चालली होती. या बसची कोल्हापूर- गारगोटी रस्त्यावरील घोडके मळा धोकादायक वळणांवर समोरुन येणाऱ्या दुचाकीला गाडीला जोराची ठोकर बसली. या ठोकरीने दुचाकीवरील एक दाम्पत्य दुचाकीवरून उडून जोरात रस्त्यावर आदळले. त्यामुळे दुचाकीस्वार (bike rider) चंदर कांबळे यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने, ते जागीच ठार झाले. त्यांची पत्नी सारिका कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

कांबळे दाम्पत्य वैयक्तिक कामानिमित्याने नागावहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून येत होते. या अपघाताने कोल्हापूर- गारगोटी रस्त्यावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -