यावर्षी मिरजेत गणेशोत्सव स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत.महाराणा प्रताप चौक येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसेना कमानींचा वाद निर्माण झाला आहे.शिंदे गटाच्या शिवसेनेने या जागेवर स्वागत कमान उभारण्याची लेखी परवानगी पोलीस ठाण्यात मागितली होती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ही स्वागत कमान उभारण्यासाठी पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे.
एकाच जागेवर दोन्ही गटांनी स्वागत कमान उभारण्याचा दावा केल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दोन्ही गटांना मिरज शहर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते.यावेळी लेखी समज दिली आहे जो पर्यंत स्वागत कमानीच्या बाबत पोलीस प्रशासन निर्णय देत नाही तो पर्यंत स्वागत कमान उभाण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून करून नये असे आदेश देण्यात आले आहेत.उद्धव ठाकरे गटाची स्वागत कमानीचा आराखडा तयार असून आज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी मातोश्री वर धाव घेतली आहे.