रोजच्या जेवणात आपल्यापैकी बहुतेकांना गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी किंवा ज्वारीची भाकरी खायला आवडते. असे असले तरी गहू पेक्षा इतर आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. ज्याचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. ओट्स हा त्यापैकी एका पर्याय असून ओट्स आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. कारण ओट्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात अनेक पोषक घटक असतात. ओट्स हे इतर धान्यांपेक्षा आरोग्याला जास्त फायदेशीर आहे. ओट्सच्या पोळीचा (Ots Roti) आहारात समावेश केल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या व्याधींपासून सुटका मिळण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया ओट्सच्या चपातीचे काय आहे फायदे.
ओट्स हे ग्लूटेन मुक्त असल्यामुळे ते खूप आरोग्यदायी मानले जातात. ग्लूटेन हा एक प्रकारचा प्रोटीन आहे ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ओट्स हे ग्लूटेन मुक्त असल्याने आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना सेलियाक आजार आहे त्यांच्यासाठी देखील ओट्स फायदेशीर आहे.
हे आहेत फायदे
मधुमेहामध्ये उपयुक्त : ओट्सच्या पिठात फायबर, व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ओट्सच्या पिठाची चपाती रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हृदय रोगापासून बचाव : मधुमेहाचा आजार असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे नियमित आहारात ओट्स फ्लोअर चपाती खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. तसेच आरोग्याला इतर फायदे देखील होतात.
पचनक्रिया सुधारते : सुदृढ आरोग्यासाठी पचनसंस्था सुरळीत आणि योग्य पद्धतीने कार्यान्वित असणे गरजेचे आहे. तुमच्या पचनक्रियेत कोणतीही समस्या नसेल तरच तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. अशा परिस्थितीत ओट्सच्या पिठाची चपाती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते, कारण यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच ओट्समधील फायबरमुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते.
(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)
आरोग्याच्या ‘या’ समस्येवर रामबाण उपाय ठरते ओट्सची चपाती, जाणून घ्या फायदे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -