Sunday, August 3, 2025
HomeसांगलीSangli : पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून

Sangli : पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तासगाव तालुक्यातील विसापूर येथे पतीनेच पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काजल प्रताप जाधव (25) असे मयताचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयातून पती प्रताप आनंद जाधव याने काजल हिच्या डोक्यात खोरे घालून तिचा जीव घेतला. पत्नी काजलचा खून केल्यानंतर प्रताप जाधव हा पळून गेला होता. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. तासगाव पोलिसांनी आरोपी प्रताप आनंदा जाधव याला दुपारी अटक केली.



याबाबत माहिती अशी, काही वर्षांपूर्वी काजल हिचा आळसंद येथील प्रताप आनंदा जाधव यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला पाच व तीन वर्षाची दोन मुलंही आहेत. सुरुवातीचे काही वर्षे दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही वर्षानंतर दोघांमध्येही चारित्र्याच्या संशयावरून वादास सुरुवात झाली. बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठय़ा भांडणात होत होते.

संसार व माहेरच्या लोकांनी एकत्रित बसून अनेकवेळा दोघांमधील वाद मिटवले होते.
मात्र, पुन्हा दोघांमध्ये वादावादी सुरू व्हायची. सततच्या वादामुळे सासरच्या लोकांनी काजल हिला पंधरा दिवसांपूर्वी विसापूर येथे माहेरी सोडले होते. वादावादीवेळी दोघांचे विषय घटस्फोटापर्यंतही गेले होते. दरम्यान, काल (सोमवारी) प्रताप हा काजल हिच्याकडे सासरवाडीला आला होता. रात्री व पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वादास सुरुवात झाली. याच वादातून प्रताप याने काजल हिच्या डोक्यात खोरे घालून तिचा खून केला. खून केल्यानंतर प्रताप हा पळून गेला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -