ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर नवीन फर्मान काढण्यात आले आहे. यंदाच्या मिरवणुकीत लेझर इफेक्टला प्रशासनाने बंदी घातली आहे. लेझर इफेक्ट वापरू नका असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. धोकादायक लेझर इफेक्ट वापरल्यास मंडळांवर कारवाई होणार अशी माहिती पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गणेश विर्सजनावेळी महाद्वार रोडवर गर्दी होऊ नये म्हणून प्रमुख मार्गासोबत पर्यायी मार्गाचा वापर करा अस आवाहन काल केलं होत. याला सकारात्मक प्रतिसाद देत एका दिवसात ८० मंडळाने होकार दिला आहे.
या मंडळाचे मी आभार मानतो. दरवर्षी पोलिस महिलांसोबत वाद होत असतात ते होवू नये म्हणून गेल्या एक महिन्यापासून नियोजन करत आहोत. यासाठी प्रत्येक मंडळाने बिनखांबी गणेश मंदिर किंवा मिरजकर तिकटी या प्रवेशाद्वारात प्रवेश करताच महाद्वार रोड ते पापाची तिकटी हे अंतर एका तासात कव्हर करावे. यामुळे प्रत्येक मंडळाला आपला देखावा दाखवता येईल असेही आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पूर्वी जो पर्यायी मार्ग होता त्याला समांतर मार्ग घोषित केला असल्याचेही त्यांनी सांगितले.उमा टॉकीज, बिंदु चौक, शिवाजी चौक, चप्पल लाईन, पापाची तिकटी या मार्गावर राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी बुथ उभारावेत असं प्रशासनाने आवाहन केल होत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.