ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे- सांगली बसमधून प्रवास करीत असताना सहप्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने व रु. ५०००/- रोख रक्कमेसह १ लाख ४४ हजार ३९५ रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या ६ महिलांच्या टोळीला पकडण्यात कासेगाव पोलिसांना यश आले असून सर्व आरोपी औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. हि कारवाई सांगली पोलिसांनी केली.
याबाबत कासेगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी कि, दिनांक १७.०९.२०२२ रोजी फिर्यादी सुनिता तात्यासाहेब पाटील रा. कवठेमहांकाळ या पुणेहून सांगलीकडे जाणारी बसमधून प्रवास करत होत्या. हि बस कराड येथे आली असता संशयित आरोपी अलबेली शिवा बुडबुड (वय २०) नर्सवा अशोक उर्फ राजु बुडबुड (वय ३५) सरस्वती वसंत बुडबुड (वय २२) रायश्वरी सचिन बुडबुड (वय २५) ज्योती सुरेश बुडबुड (वय २५) अंजली प्रदिप बुडबुड (वय २५) या सर्व सदर बस मध्येचढल्या.
मात्र सदरची बस वाळवा तालुक्यातील कासेगाव दरम्यान आली असता फिर्यादींच्याजवळ ५५,०००/- रु. किंमतीचा लक्ष्मीहार, ४६,६६५/रु. किंमतीचा नेकलेस, ३६,४९४/-रु. किंमतीचे गंठन, ८५६/-रु. किंमतीची एक बारशे अंगठी, व ५०००/- रु रोख रक्कम असा एकूण १ लाख ४४ हजार ३९५ रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सदर बसमध्ये शोधा शोध करून आरडा ओरडा केला असता नेलें एसटी स्टॅन्ड येथे संशयीत महिला बसमधून घाई गडबडीत खाली उतरल्या हे लक्षात आल्यावर त्यांच्या पाठोपाठ फिर्यादी खाली उतरल्या. मात्र सदरच्या संशयीत महिला ह्या तेथून कोठेतरी निघून गेल्याच्या फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने व त्यांनी त्यांची पर्स चोरली असल्याचे फिर्याटी गांचे लक्षात आले. त्यांनी कासेगांव पोलीस ठाण्यात चोरीची फिय व संशयीत महिलांचे वर्णन सांगितले.