ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील मा.आयुक्तसो कांतीलाल उमप साहेब मा.संचालक सो दक्षता व अंमलबजावणी सुनील चव्हाण साहेब विभागीय उप आयुक्त तडवी साहेब व अधीक्षक सांगली सौ.संध्याराणी देशमुख मॅडम यांचे मार्गदर्शनानुसार निरीक्षक मिरज अरुण शंकर कोळी,दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार, अभिनंदन कांबळे,सहा दु नि षडाक्षरी केंगारे फिर्यादी,जवान संतोष बिराजदार,स्वप्नील आटपाडकर,सचिन सावंत,वाहन चालक वसंत घुगरे,यांनी दि.१९ संप्टेबर रोजी घोरपडी तालुका कवठेमहांकाळ जि सांगली येथे दोन आरोपी इसमा विरोधात बेकायदेशीर गोवा परराज्यातील बनावटी विदेशी मद्याची आयात करुन महाराष्ट्र बनावटीच्या लेबल बुचे यांचा वापर करून १८० मिली घ्या रिकाम्या बाटल्या बनावट मद्य भरुन त्याची वाहतूक आणि विक्री करत असताना केलेल्या कारवाईमध्ये एक महेद्रा बोलेरो जप्त केली आहे.
तसेच सदर कारवाईमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्य ८३६ बाटल्यांचे १२ प्लास्टिक पोती असा रुपये ३,२०,९६० किंमतीचा मद्य साठा जप्त केला आहे.यामध्ये दोन आरोपींना अटक केली आहे.यामध्ये घोरपडी येथील मिलिंद लक्ष्मण मलमे व पाचेगाव (बुद्रुक) ता.सांगोला जि.सोलापूर येथील वाहन मालक भगवान सुखदेव कचरे या दोन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास अरुण कोळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज हे करीत आहेत.