ताजी बातमी ऑनलाईन टीम
फॅशन आयकॉन बनलेली उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूकने लोकांना आश्चर्यचकित करत असते. नुकतीच उर्फी सिमकार्डने तयार केलेला ड्रेस परिधान करून दिसली होती. तिने 2000 सिमकार्डने बनवलेला ड्रेस घातला होता. यानंतर अजून एक अतरंगी आउटफिट घालून तिने लोकांना पुन्हा एक धक्का दिला आहे. उर्फी जावेदच्या या ड्रेसची कोणी कल्पना देखील करु शकत नाही. तिने चक्क काचांचे तुकडे आपल्या शरीरावर लावले आहेत. एवढेच काय तर तिने चेहऱ्यावर देखील काचांचा मास्क लावला आहे. तिचा हा जगावेगळा लूक पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.
डान्स करताना दिसली उर्फी
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने काचांनी आपली छाती कव्हर केल्याचे दिसत आहे. यासोबतच तिने चेहऱ्यावर देखील काचांचा मास्क लावला आहे. या व्हिडिओमध्ये ती दर्द ए डिस्को या गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने आता याला काय मेकअप आणि हेअर क्रेडिट देऊ? असेही लिहिले आहे. आता तिच्या या व्हिडिओवर लोकांच्या विविध कमेंट्स येत आहेत.



