भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 3rd T20I) तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20 ( Team India ) सामन्यामध्ये टीम इंडियाने 6 विकेट्सनं विजय मिळवत मालिकाही खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 2022 वर्षांतील 21वा ट्वेन्टी-20 विजय ठरला. यांसह भारताने एका वर्षांत सर्वाधिक ट्वेन्टी-20 सामने जिंकण्याचा नवीन रेकॉर्ड केला आहे.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना युवा फलंदाज कॅमेरून ग्रीननं 21 चेंडूत 52 तर टीम डेव्हिडने 27 चेंडूत 54 धावा केल्या. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलनं यंदाच्या सामन्यातही फॉर्म कायम राखत ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज तंबूत पाठवले.
भारताकडून भक्कम आव्हानाचा पाठलाग करताना के. एल. राहुल (4 चेंडूत 1 धाव) आणि रोहित शर्मा (14 चेंडूत 17 धावा) झटपट बाद झाले. यामुळे भारतीय संघावर दबाव वाढला. पण यांनंतर थोडीशी संथ फलंदाजी चालू ठेवल्यानंतर सूर्यकुमार यादव (36 चेंडूंत 69 धावा) आणि विराट कोहली (48 चेंडूंत 63) यांनी फटकेबाजी करत जोरदार अर्धशतकांच्या जोरावर भारतानेच ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने विजयी चौकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिक 1 धावेवर नाबाद राहिला.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल
ऑस्ट्रेलिया संघ:
ॲरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, ॲडम झाम्पा, डॅनियल सॅम्स.