Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरः मंजूर बील काढण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी; ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत...

कोल्हापूरः मंजूर बील काढण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी; ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य अटकेत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या मंजूर बीलापैकी उर्वरित रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी लाच स्विकारताना कुर्दू (ता. करवीर) चे ग्रामविकास अधिकारी महादेव गणपती डोंगळे (वय ५६, रा. घोटवडे, ता. राधानगरी) व ग्रामपंचायत सदस्य धनाजी मारुती पाटील (वय ४७ रा. कुडू) यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, गुरुवारी दुपारी सापळा रचून लाचखोरांना पकडले.



स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कुर्दू (ता. करवीर) गावात तक्रारदारास २, ९९,४३० रुपये सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम करवीर पंचायत समितीकडून मिळाले, बांधकामही पूर्ण केले. त्यापैकी त्यांना पंचायत समितीकडून २ लाख १० हजार व ग्रामपंचायतकडून ८९,४३७ रुपये मिळणार होते. त्यापैकी पंचायत समितीकडून १ लाख ९७ हजार रुपये तक्रारदारास मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -