Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; परंपरेनुसार आई अंबाबाईला तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण...

कोल्हापूर ; परंपरेनुसार आई अंबाबाईला तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण…

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कोल्हापूर : तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून गुरुवारी करवीर निवासिनी अंबाबाईला सोनेरी रंग लाल काठ-पदराचा १ लाख १० हजाराचा शालू अर्पण करण्यात आला. त्याच बरोबर बांगड्या, ओटी, तिरुपती चा प्रसाद तिरुमला देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभा रेड्डी, सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्वीकार करण्यात आला.




तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात देशभरातील विविध शक्तीपीठांना महावस्त्र किंवा शालू अर्पण केला जातो. त्यानुसार करवीर निवासिनी अंबाबाईलाही कित्येक वर्षापासून हा शालू अर्पण केला जात आहे. यावर्षी आज जयघोष करत शालू मंदिरात आणण्यात आला विधीवत मंत्रोपचारामध्ये शालू देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -