Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाIND Vs SA: टीम इंडियात या क्रिकेटपटूनं घेतली जसप्रीत बुमराहची जागा, BCCI...

IND Vs SA: टीम इंडियात या क्रिकेटपटूनं घेतली जसप्रीत बुमराहची जागा, BCCI ने केली घोषणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या टी-20 मालिका (T-20) सुरु आहे. अशात दुखापतीमुळे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. याबाबत बीसीसीआयने शुक्रवारी अधिकृत घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज सिराजने भारतासाठी अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियात पुन्हा सामील झाल्याने त्याला 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठीही संधी मिळू शकते.


जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून सिराजचा संघात समावेश केल्याची माहिती जाहीर केली. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -