ताजी बातमी ऑनलाईन टीम
कमी वेळेत ज्यादा पैसे मिळतील, या हव्यासापोटी सागरने लोकांकडून पैसे गोळा करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रणवचा भाऊ पंकजला तब्बल एक कोटी रुपये दिले. या बदल्यात पंकजने बरेच महिने मुद्दल आणि परतावाही दिला नाही, म्हणून कुपवाडमधील सहाजणांच्या टोळक्याने रक्कम वसुलीसाठी प्लॅन करून प्रणवचे अपहरण करून ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामध्ये कुपवाडमधील प्रणव नामदेव पाटील (23, रा. लाड शाळेमागे) या तरुणाचे ‘त्या’ सहाजणांनी मिळून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केल्याचे उघडकीस आले. याबाबत प्रणवच्या पत्नीने कुपवाड पोलिसात धाव घेऊन पतीच्या अपहरणाबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रणवच्या शोधासाठी पथके रवाना केली आणि अखेर सहाजणांच्या टोळीला पकडून मुसक्या आवळण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांना शुक्रवारी यश आले.
यामध्ये संशयित राजू रावसाहेब काळे (28, रा. शरदनगर, कुपवाड), सागर सुखदेव कोळेकर (33), संदेश रामचंद्र घागरे (19), कल्पेश दिनकर हजारे (21, तिघेही रा. वाघमोडेनगर, कुपवाड),किरण शंकर लोखंडे (23),सोन्या ऊर्फ बापू हरी येडगे (27, दोघेही रा. बामणोली, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील गुह्यात वापरलेली एक स्वीफ्ट कार, हत्यारे व मोबाईल असा 4 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या सहाजणांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता 11 ऑक्टोबरपर्यं । दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला आहे.