Friday, November 22, 2024
Homeराजकीय घडामोडीकाँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली; पोटनिवडणुकीत देणार भक्कम साथ

काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली; पोटनिवडणुकीत देणार भक्कम साथ

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. आज मातोश्रीवर जाऊन नाना पटोले, भाई जगताप आणि अमित देशमुख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यांशी बोलताना काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, जरी हि जागा काँग्रेसची असली तरी महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणूका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिलं त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं आमचं ठरल होत. त्याप्रमाणे आम्ही या अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करणार आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी काँग्रेस संपूर्ण ताकदीने प्रचार करणार आहे. आम्ही 50 ते 60 हजर मतांनी शिवसेनेला याठिकाणी विजयी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची जागा रिक्त होती. उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात काँग्रेसलाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे आधीच अडचणीत असलेल्या उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मोठं बळ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -