Monday, August 4, 2025
Homeराजकीय घडामोडीअंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा!

अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा!

शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas aghadi goovernment) कोसळले. यानंतर महाविकास आघाडी एकत्र निवडणुका (Election)लढवणार की, नाही असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. मात्र आता अंधेरीतील पोटनिवडणूक (Andheri By Election) शिवसेना,(Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस पक्ष (Congress) एकत्र लढवणार आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला या दोन्हीही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आमदार रमेश लटके (MLA Ramesh latke) यांच्या निधनानंतर येथील जागा ही रिक्त झाली होती. या विधानसभेच्या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये तिन्हीही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील. तिन्हीही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली.

पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, ‘अंधरेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवली जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंबा जाहीर केलाय. यासोबतच राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रमाणे आता 3 नोव्हेंबर रोजी होणारी ही पोटनिवडणूक ही मविआ एकत्र लढवणार आहे.’

13 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

अनिल परबांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की,येत्या 13 तारखेला उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. सकाळी 11 वाजता तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येतील असे देखील अनिल परबांनी सांगितले आहे.

रमेश लटकेंच्या पत्नीलाच उमेदवार

3 नोव्हेंबर रोजी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून येथील दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा जिंकता यावी यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात आहे. निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना पूर्णपणे प्रयत्न करत आहे. ही जागा जिंकता यावी यासाठी महाविकास आघाडीतील दोन घटकपक्षांची सेनेला साथ दिली आहे. ऋतुजा लटकेंच्या विजयासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांकडून देखील प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना मशाल चिन्हावर लढवणार निवडणूक

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. आता दोन्हीही गटांना वेगवेगळे चिन्ह देण्यात येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. यानंतर आता अंधेरी पोटनिवडणूक मशाल या चिन्हावर लढवली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -