ताजी बातमी ऑनलाईन टीम
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रम्हास्र चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुसंख्य लोकांनी हा चित्रपट चित्रपटगृहातच पाहिला असेल, पण ज्यांनी आजपर्यंत हा चित्रपट पाहिला नाही त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आता हा चित्रपट लवकरच OTT वर देखील प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्रमध्ये मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि शाहरुख खान हे स्टार्स देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानने कॅमिओ केला आहे.
हा चित्रपट लवकरच डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाईल. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या स्ट्रीमिंगची तारीख जाहीर केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट दिवाळीच्या एक दिवस आधी OTT वर स्ट्रीम केला जाऊ शकतो. 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे, त्यामुळे हा चित्रपट 23 ऑक्टोबरला ओटीटीवर दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे.